
अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanangar amc public issue: अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ७ मधील बालिकाश्रम रोड व भिंगारदिवे मळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. काही ठिकाणी अजिबात पाणी येत नाही, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येकडे महापालिकेने तातडीने लक्ष देत पाईपलाइन आणि वॉलची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्षा अॅड. विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, संघटक मंत्री रवी सातपुते आणि युवा उपाध्यक्ष पत्रकार विजय एकनाथ लोंढे यांनी महापालिकेत जाऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली.
त्यांनी पुढील आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित या समस्येबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

