अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar youth festival: युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरेचे जतन, सुप्त गुणांना वाव देणे आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवांचे आयोजन केले जाते. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने ता. ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी दिली.
महोत्सवात आयोजित स्पर्धा —
सांस्कृतिक विभाग: लोकनृत्य, लोकगीत
कौशल्य विकास: कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता इत्यादी
नवोपक्रम विभाग: विज्ञान प्रदर्शन
नियम, अटी व बक्षिसे —
स्पर्धा वयोगट: १५ ते २९ वर्षे (१२ जानेवारी २०२६ रोजी वयाची गणना केली जाईल).
प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येतील.
विजेत्यांना विभागीय, राज्य वा राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी दिली जाईल.


