Ahilyanagar womens: महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि सीएसआरडी संस्था यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषणेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महिला परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. मनिषा गुप्ते यांनी गेल्या पन्नास वर्षातील स्त्रियांच्या चळवळीचा आढावा घेतला.
“स्त्रियांच्या चळवळीमुळे स्त्रीजीवनात मोठे परिवर्तन झाले आहे. हा वारसा पुढे न्यायचा असेल तर स्त्री-पुरुष समतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवून संविधानाच्या आधारावर काम करणे गरजेचे आहे.”
परिषदेचे उद्घाटन सीएसआरडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांनी केले. “महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री-मुक्तीच्या कार्याचा वारसा आजच्या चळवळींनी पुढे नेला आहे,” असे ते म्हणाले.
Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य
पोलिस भरोसा विभागाच्या प्रमुख प्रियंका आठरे यांनी ‘भरोसा सेल’च्या कामकाजाची माहिती दिली.
परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर म्हणाल्या, “सर्व धर्मीय समाजाच्या एकात्मतेच्या वातावरणातच स्त्री चळवळीला सामर्थ्य मिळते. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवत भगिनीभाव वाढवणे हे चळवळीचे खरे कार्य आहे.”
परिषदेच्या प्रास्ताविकात नीलिमा जाधव-बंडेलू यांनी “अहमदनगर जिल्ह्यातील चळवळींचा वारसा पुढे न्यायला हवा” असे आवाहन केले.
प्रमुख पाहुण्या कॉ. लता भिसे यांनी महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या वाटचालीचा आणि विविध मोहिमांचा आढावा घेत सांगितले, “एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन स्त्री चळवळ पुढे न्यायची आहे.”

डॉ. रमेश अवस्थी आणि कॉ. स्मिता पानसरे यांनी स्त्रियांवरील हिंसेच्या विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली. या चर्चेत सर्व प्रकारच्या हिंसेविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्याची गरज सहभागी प्रतिनिधींनी व्यक्त केली.
ॲड. निर्मला चौधरी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींच्या प्रश्नावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात शाहीर प्रवीण सोनवणे व साथींनी चळवळींवरील प्रेरणादायी गीते सादर केली. संध्या मेढे यांनी आभार मानले.
परिषदेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करणारे: संध्या मेढे, ॲड. निर्मला चौधरी, विजया जाधव, सॅम्युअल वाघमारे, भैरवनाथ वाकळे, ॲड. मीनल देशमुख, सत्यभामा थिटमे, सुरेखा आडम, बेबीताई जाधव, शांताराम गोसावी, मंगला भावसार, सरोज आल्हाट आणि स्मिता पानसरे.
या परिषदेला स्त्री-पुरुष प्रतिनिधींचा मोठा सहभाग लाभला.