Ahilyanagar social: निमगाव वाघात स्त्रीशक्तीचा गौरव; नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात

Photo of author

By Dipak Shirsath

 

Ahilyanagar social,स्त्रीशक्ती,नवदुर्गा,

नगर तालुका | प्रतिनिधी

Ahilyanagar social: नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्त्रीशक्तीचा गौरव करणारा नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा सोहळा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

परिवार मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात देवीची प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरातपोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सरपंच उज्वला कापसे, संदीप वाबळे, कार्यक्रमाचे संयोजक व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांसह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य

पै. नाना डोंगरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती साधली असून समाजातील विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. महिलांचा सन्मान करणे व सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हेच या सोहळ्याचे मुख्य उद्देश होते. यावेळी बचत गटातील महिलांचा विशेष मेळावा पार पडला. महिलांना निंबळक प्रभाग समन्वयक संदीप वाबळेपंचायत समितीच्या रोहिणी आगरकर यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांनी सांगितले की, सोशल मीडियावर अनेक फसवणुकीचे प्रकार होत असल्यामुळे महिलांनी आपले वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा माहिती शेअर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. सुरक्षित इंटरनेट वापर महिलांमध्ये प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे.

Ahilyanagar social,स्त्रीशक्ती,नवदुर्गा,

सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात म्हणाल्या, “मुलींना सक्षम, सबल बनवा; त्यांच्या सर्वांगीन विकासावर भर द्या. कोणत्याही संकटाला सामना करण्यासाठी मुलींना सक्षम बनवणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना देवीचा दर्जा दिला आहे; त्याचा सन्मान करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.”

Ahilyanagar social,स्त्रीशक्ती,नवदुर्गा,

सन्मानित महिलांमध्ये सरपंच उज्वला कापसे (सामाजिक व राजकीय क्षेत्र), नगर पंचायत समितीचे कृषी व्यवस्थापक रोहिणी आगरकर (कृषी), सरोज आल्हाट (कवियत्री व साहित्यिक), डॉ. सौ. अस्मिता खिस्ती (वैद्यकिय), मुख्याध्यापिका संगीता फुलसौंदर (शिक्षण), वैशाली वर्पे (सहकार), महसूल सेवक सुनीता जाधव (शासकीय), सोनाली फलके (बचत गट), देवकी ढोकणे (शैक्षणिक), मंगल ठाणगे (बचत गट), पूर्वा ख्रिस्ती (शैक्षणिक) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आगरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाचा संदेश आणि विविध क्षेत्रातील महिला कर्तृत्वाची प्रशंसा यावर भर देण्यात आला.

हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group