
अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar social: मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीने त्यांना भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान पुरस्कार जाहीर केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.
कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या या गुणगौरव सोहळ्यात सेवानिवृत्त सनदी अधिकारी पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते पै. डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे,पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. डॉ. विजयकुमार ठुबे, सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश इथापे, उपाध्यक्ष बाळकृष्ण काळे, संचालक मंडळाचे सदस्य किशोर मरकड, ज्ञानदेव पांडुळे, डॉ. कल्पना ठुबे, स्वाती जाधव, नंदिनी सोनाळे,
तसेच राजेश परकाळे, उदय अनभुले, राजश्री शितोळे, सतीश इंगळे, प्रा. किसन पायमोडे, कालिदास शिंदे, डॉ. काशिनाथ डोंगरे, इंजि. संभाजी मते, द्वारकाधीश राजे भोसले, बाळासाहेब सोनाळे, ॲड. राजेश कावरे, निवृत्ती रोहकले व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड आदी मान्यवर उपस्थित होते.
Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य
पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या माध्यमातून वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय चळवळ सुरू केली आहे. मुलांमध्ये वाचनाची सवय निर्माण व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. याशिवाय काव्यसंमेलन व साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना व साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. या सर्व कार्याची दखल घेत भारतीय दलित साहित्य अकादमीने त्यांना भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर केला आहे.
सोहळ्यातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरवर्षी पतसंस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचा होणारा सन्मान हा प्रेरणादायी असल्याचे मत पै. डोंगरे यांनी व्यक्त केले.
64
Like this:
Like Loading...