
Ahilyanagar social: सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सहकार्यभाव मनात ठेवत जेऊर येथील लिटल वंडर स्कूल अँड विस्डम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संकटातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अलीकडील मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीबद्दल समजताच विद्यार्थ्यांनी स्वतःहून मदत मोहिम राबवून सामाजिक जाणीवेचे आदर्श उदाहरण घालून दिले.
‘मिशन माणुसकी’ या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या खिशातील पैशांतून तसेच स्वतःचा खाऊ वाचवून कपडे, वह्या, पुस्तके, खाऊ, अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू जमा केल्या. काही विद्यार्थ्यांनी घराघरातून वापरण्यायोग्य साहित्य जमा करून शाळेत आणले. हे सर्व साहित्य शाळेच्या संचालिका स्वाती चेमटे आणि मुख्याध्यापक सुशिल खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पॅक करून पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले.
Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य
काही विद्यार्थ्यांनी घराघरातून वापरण्यायोग्य साहित्य जमा करून शाळेत आणले. हे सर्व साहित्य शाळेच्या संचालिका स्वाती चेमटे आणि मुख्याध्यापक सुशिल खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पॅक करून पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले.
यावेळी संचालिका स्वाती चेमटे यांनी सांगितले, “लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होणे, हीच खरी शिक्षणाची दिशा आहे.” तर मुख्याध्यापक सुशिल खेडकर म्हणाले, “लिटल वंडर स्कूलचे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर समाजकार्यातही आघाडीवर आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
या उपक्रमासाठी संस्थेतील मनिषा क्षेत्रे, कल्पना वड्डेपल्ली, मुशरा खान, मिनाक्षी साळवे, आमरिन पठाण, डेव्हिड भोसले आदींनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, दयाभाव आणि मानवतेची जाणीव दृढ झाली असून, लिटल वंडर स्कूलच्या या सामाजिक कार्याचे पालक आणि नागरिकांनी कौतुक केले.

दैनिक रयत समाचारच्या ‘मिशन माणुसकी‘ आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत लिटल वंडर स्कूलच्या वतीने डेव्हिड भोसले यांनी पूरग्रस्तांसाठी संकलित केलेले साहित्य रयत समाचार कार्यालयात सुपूर्द केले. यावेळी उपसंपादक दिपक शिरसाठ, सहसंपादक तुषार सोनवणे, दिपक नेटके, संपतराव रोहोकले आदी उपस्थित होते.
40
Like this:
Like Loading...