अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar social: आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांना फराळ वाटप करत दिवाळी साजरी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ म्हणाले की, “शुभेच्छा देण्यासाठी आणि आनंदाच्या क्षणी सर्वजण एकत्र येतात; पण जे आजारी असून दुःखात आहेत, त्यांच्यासोबत जाऊन दिवाळी साजरी करणे ही खरी माणुसकी आहे.”

कार्यक्रमानंतर भरत खाकाळ यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्या वेळी जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. “लवकरच एमआरआय मशीन मिळावे यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत,” असेही ते म्हणाले.
या वेळी आप जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या सचिव कावेरी भिंगारदिवे, युवा आघाडीचे उपाध्यक्ष पत्रकार विजय लोंढे, ओम संतोष भिंगारदिवे, सोहम संतोष भिंगारदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


