नगर तालुका | प्रतिनिधी
Ahilyanagar public issue: निंबळक बायपास चौकातून सुपा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून गळती लागली होती. या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात होते, तसेच रस्ता खचणे, मोठे खड्डे पडणे आणि उड्डाणपुलाच्या पिलरलाही भेगा पडणे यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली होती.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर संबंधित विभागाने आज शनिवार, ता. १ नोव्हेंबर रोजी दुरुस्तीचे काम हाती घेतले.
एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एन. अनुसे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

दरम्यान, डॉ. पवार यांनी जलवाहिनी दुरुस्तीला सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि “दीर्घकाळ चालणारी ही समस्या अखेर मार्गी लागल्याबद्दल प्रशासनाचे आभार” व्यक्त केले.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


