नगर तालुका | प्रतिनिधी
Ahilyanagar public issue: खातगाव–इसळक या अर्धवट रस्त्याचे काम मार्गी लावावे, या मागणीसाठी आज प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यांत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर मंजूर केला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता ए. बी. चव्हाण यांनी दिले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून खातगाव–इसळक रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू झाले होते, मात्र ते अर्धवट अवस्थेतच थांबले. त्यामुळे नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि दूध उत्पादक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हे काम लवकर पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर आणि उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिला होता. त्यानुसार आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन तातडीने दुरुस्ती सुरू करण्याचा निर्णय घेतला. भरावाचे काम सुरू करण्यात आले असून, डांबरीकरणासाठी मंत्रालयीन मंजुरी प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.
या रस्त्याचा वापर खातगाव, टाकळी, हिंगणगाव, कर्जुने खारे आणि निमगाव घाणा परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. लवकरच या सर्वांची वाहतुकीची अडचण दूर होणार आहे.

या प्रसंगी मा. सभापती रामदास भोर, उपसभापती डॉ. दिलीप पवार, प्रकाश कुलट, देविदास कुलट, निलेश सातपुते, सोपान पठारे, नानासाहेब काळे, देवा ढगे, मधुकर सातपुते, कैलास लांडे, दौलत कुलट, श्रीकांत भागवत, नवनाथ ताकपेरे, विष्णु कुलट, रामदास फुले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


