Ahilyanagar politics: शिवसेना-रिपब्लिकन सेनेची युती; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक एकजुटीने लढविणार

Photo of author

By Dipak Shirsath

Ahilyanagar politics, शिवसेना, रिपब्लिकन,

अहमदनगर | प्रतिनिधी

Ahilyanagar politics: महाराष्ट्रात झालेल्या शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या युतीनंतर शहरातील पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाण्याचा व सर्व उमेदवार बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला संभाजीराजे कदम, दिलीप सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गणेश कवडे, दत्तात्रय कावरे, आप्पा नळकांडे, सुरेश तिवारी, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड, महेश लोंढे, दामोदर भालसिंग, शहराध्यक्षा सुनिता शिंदे, उपाध्यक्ष नेहा जावळे, महेश भोसले, संघटक बेबीताई टकले, बाळासाहेब कसबे, युवक जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे, सविता कवडे, संजय ताकवले, सत्यवान नवगिरे, गणेश परहार, रवींद्र उरणकर, गणेश कोकडे, सनी कांबळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahilyanagar politics, शिवसेना, रिपब्लिकन,

शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले की, “शिवसेना-रिपब्लिकन सेनेची युती कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करत आहे. या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार असून, महापालिकेवर भगवा आणि निळा झेंडा फडकणार.”

Ahilyanagar politics, शिवसेना, रिपब्लिकन,

जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी सांगितले की, “ही युती बहुजन समाजाला एकत्र आणणारी आहे. या माध्यमातून महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, कारण तळागाळापर्यंत सर्व कार्यकर्ते एकमेकांशी जोडलेले आहेत.”

संभाजी कदम यांनीही या युतीला “विजयाची नांदी” असे संबोधत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.

हे हि वाचा : Aaple sarkar: ‘आपले सरकार’ केंद्र सेवा अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु; 10 ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त

 

Leave a Comment