केंद्र व राज्य सरकारवर लोकशाहीची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप

Ahilyanagar politics: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर खुल्या न्यायालयात झालेल्या बूटफेकी घटनेचा आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेकायदेशीर अटकेचा निषेध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) यांनी गुरुवार, ता. 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली: “लोकशाही वाचवा!”, “न्यायसंस्थेचा अपमान थांबवा!”, “सोनम वांगचुक यांना मुक्त करा!”
या आंदोलनात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. उपस्थितांमध्ये भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, कॉ. स्मिता पानसरे, किसान सभेचे कॉ. बन्सी सातपुते, आयटकचे जिल्हा सचिव कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, कॉ. आप्पासाहेब वाबळे, भारत अरगडे, भारती न्यालपेल्ली, प्रा. डॉ. सुभाष कडलग, कॉ. सतीश पवार, सगुना श्रीमल, संगीता कोंडा, लावण्या न्यालपेल्ली, कॉ. सुनील दुधाडे, राजेंद्र व्यवहारे, महादेव पालवे यांचा समावेश होता.
भाकपच्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारवर लोकशाहीची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवरील थेट हल्ला आहे आणि सर्वोच्च न्यायालयावर बूटफेक होणे भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेचा अपमान आहे.
नेत्यांनी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
आंदोलनकर्त्यांनी शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत करण्यात आलेल्या अटकेचा तीव्र निषेध नोंदवला आणि त्यांना पर्यावरण, शिक्षण व सामाजिक न्यायासाठी अहिंसक मार्गाने लढणारे कार्यकर्ते म्हणून उल्लेख केला.
भाकपच्या वतीने पुढील मागण्या केल्या: सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि सोनम वांगचुक यांच्या अट रद्द करून तात्काळ सुटका करावी.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

