अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५

अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar Police Recruitment 2025: जिल्ह्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी! दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती २०२४-२५ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरतीत एकूण ७३ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
उमेदवारांना २९ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील. ही भरती प्रक्रिया राज्यभर एकसमान पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
🔗 अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळे:
भरती प्रक्रियेत अर्हता, वयोमर्यादा, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि फी संबंधी सविस्तर तपशील लवकरच वरील संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यंदाच्या निवडणुकांमुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलली जाईल अशी चर्चा होती. मात्र, अधिकृत जाहिरातीमुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या भरतीमुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना पोलीस दलात दाखल होण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
📍 मुख्य माहिती:
पदाचे नाव | पोलीस शिपाई |
|---|---|
एकूण पदे | ७३ |
अर्ज सुरू | २९ ऑक्टोबर २०२५ |
अर्ज समाप्त | ३० नोव्हेंबर २०२५ |
अधिकृत संकेतस्थळे | policerecruitment2025.mahait.org, mahapolice.gov.in |
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

