अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar literature: महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ता. ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि साहित्यप्रेमींच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ता. ३ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका स्वहस्ते, पोस्ट, कुरियर किंवा ईमेलद्वारे पाठविण्याचे आवाहन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह. भ. प. सिद्धिनाथ मेटे महाराज यांनी केले आहे.
मेटे महाराज म्हणाले, “साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक व साहित्यरसिकांना जोडणारा दुवा आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्जनशील मंडळींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने निबंध, चित्रकला, कविता आणि वेशभूषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.”
प्रवेशिका पुढील ईमेल किंवा पत्त्यावर पाठवाव्यात:
📧 aatmnirdharfoundation2014@gmail.com
🏢 न्यू तिरंगा प्रिंटर्स, गाळा नं. १, छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल, नालेगाव, तानवडे पॅथलॉजीकल लॅबजवळ, अहिल्यानगर – ४१४००१
📞 ९८२३९३४२४६
चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे विषय व नियम
निबंधलेखन: २०० ते २५० शब्दांमधील निबंध.
विषय –
सेनापती बापट यांचे विचार व कार्य
नगर जिल्ह्याचे साहित्य-संस्कृतीमधील योगदान
नगर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक (कोणत्याही एका व्यक्तीवर आधारित)
चित्रकला स्पर्धा:
विषय –
सेनापती बापट किंवा इतर स्वातंत्र्यसैनिकांची भावमुद्रा
गट:
गट १ : ५–१० वर्षे,
गट २ : ११–१५ वर्षे,
गट ३ : १६–२० वर्षे,
गट ४ : खुला गट.
प्रत्येक तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेते तसेच गटनिहाय जिल्हास्तरीय तीन विजेते निवडले जाणार आहेत. सर्व विजेत्यांचा सन्मान संमेलनात मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
कविता लेखन व वेशभूषा स्पर्धेत जिल्हास्तरीय पुरस्कार
‘सेनापती बापट यांचे विचार व कार्य’ या विषयावर विशेष कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
तसेच, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत होणाऱ्या ग्रंथफेरी व ग्रंथदिंडी कार्यक्रमात वेशभूषा स्पर्धा होणार आहे.
विषय – भारतातील महत्वाचे लेखक, महापुरुष आणि पारंपरिक वेशभूषा.
दोन्ही स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांचा सन्मान करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी ‘अहिल्यानगर साहित्य संमेलन’ या फेसबुक पेजला भेट द्या:
🌐 www.facebook.com/ahilyanagar.sahitya
आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी म्हणाले, “सेनापती बापट हे पारनेरचे भूमीपुत्र असून स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे. नगर जिल्ह्याच्या साहित्यिक चळवळीला उजाळा देण्यासाठी आम्ही हे संमेलन आयोजित केले आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या शाळांचाही सन्मान करण्यात येणार आहे.”
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा



खूप छान