अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar literature: स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाचे नियोजन मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी लेखक सचिन मोहन चोभे, तर कार्याध्यक्षपदी सिद्धनाथ मेटे महाराज, तसेच समन्वयक म्हणून लेखक रामदास कोतकर यांची निवड करण्यात आली.
रविवार, ता. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत संमेलनाची प्राथमिक रूपरेषा निश्चित करण्यात आली. या बैठकीबाबतची माहिती आयोजक संस्था ‘आत्मनिर्धार फाउंडेशन’चे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आज झालेल्या तिसऱ्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. काही सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काहींनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग नोंदविला.
बैठकीत महिला, नवसाहित्यिक, दिव्यांग आणि वंचित घटकांना संमेलनात सहभागी करून घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. रमेश आमले यांनी संयोजन समितीचा ठराव मांडला, तर आनंदा साळवे यांनी त्यास अनुमोदन दिले.
संयोजन समितीच्या सहसमन्वयकपदी कवयित्री स्वाती पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच निमंत्रण समितीत शब्बीरभाई शेख, हेमलता पाटील, रमेश आमले, सुभाष सोनवणे, अमोल इथापे, शेख रज्जाक आणि ऋतिक लोंढे यांचा समावेश आहे.
व्यवस्थापन समितीत संदीप गेरंगे, भानुदास कोतकर, वसंत कर्डीले, नामदेव लोंढे, प्रा. शरद दारकुंडे, ॲड. सचिन चंदनशिव, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रा. अमोल सायंबर, अजिंक्य काटकर, मेहेक वाणी, राजेंद्र खुंटाळे आणि देविदास बुधवंत यांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी स्वीकारली.
संमेलनाचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून ॲड. राहुल ठाणगे आणि मकरंद घोडके कार्यरत राहतील. संमेलनाची नेमकी तारीख व संमेलनाध्यक्षांची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती महादेव गवळी यांनी दिली.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


