Ahilyanagar health: ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ – सरपंच उज्वला कापसे; निमगाव वाघा येथे ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

Photo of author

By Dipak Shirsath

 

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Ahilyanagar health,आरोग्य,संपत्ती,

अहिल्यानगर | प्रतिनिधी

Ahilyanagar health: नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निमगाव वाघा ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, एशियन नोबल हॉस्पिटल, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच उज्वलाताई कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, डॉ. सारिका उजागरे, शशिकांत साळवे, शोभा चौरे, अमर त्रिभूवन, सीएचओ डॉ. सुवर्णा राऊत, अश्विनी झावरे, संगिता आतकर, दिपाली कदम, रेखा ठोंबरे, राहुल डेरे, तसेच युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य

या शिबिरात एशियन नोबल हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी ग्रामस्थांची रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, रक्तचाचणी, नेत्र तपासणी आदी विविध प्रकारची तपासणी केली. तपासणीनंतर काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सरपंच उज्वलाताई कापसे म्हणाल्या की, “आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी जीवनासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो; परंतु अशा आरोग्य शिबिरांमुळे आजारांची लवकर ओळख होते आणि योग्य उपचार वेळेत सुरू करता येतात.”

Ahilyanagar cultural politics: अहमदनगर मनपाच्या माजी विरोधी पक्षनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल! ‘महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश होऊ देणार नाही’ म्हणत धार्मिक ध्रुवीकरणाला कडाडून विरोध

त्यांनी पुढे सांगितले की, गावकऱ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, “सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेले हे शिबिर म्हणजे आरोग्यदायी समाजनिर्मितीचा प्रयत्न आहे. आजच्या तरुण पिढीने केवळ स्वतःच्या नव्हे, तर संपूर्ण गावाच्या आरोग्याबद्दल जबाबदारी घ्यावी. सेवाभावी कार्यातूनच निरोगी आणि सदृढ समाजाची निर्मिती शक्य आहे.”

हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group