अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar environmental: निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात शालेय परिसरातील साचलेला कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला, झुडपे व गवत कापण्यात आले तसेच झाडांना पाणी घालून त्यांचे संवर्धन करण्यात आले.
पै. नाना डोंगरे यांनी या उपक्रमाद्वारे “स्वच्छ शाळा, सुंदर शाळा!” हा संदेश दिला. दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करुन त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मागील २५ वर्षांपासून त्यांच्या संस्थेमार्फत पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाचे सातत्याने कार्य केले जात आहे. या मोहिमेत लहानू जाधव आणि आनंद गेनाप्पा यांनीही सहकार्य केले.

“पै. नाना डोंगरे यांचे पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शाळा परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि हरित वातावरणात बदल होत आहे.”
पै. नाना डोंगरे म्हणाले, “पर्यावरणाचे रक्षण हे फक्त सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण आपले शाळा, अंगण, गल्ली आणि गाव स्वच्छ व हिरवे ठेवले, तरच भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी वातावरण निर्माण होईल. एक झाड लावणे ही केवळ कृती नसून ती समाजाप्रती आपली बांधिलकी आहे.”
डोंगरे संस्थेमार्फत संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबविले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाच्या ‘मेरा युवा भारत’ अभियानांतर्गत त्यांना ‘स्वच्छता ही सेवा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


