अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar District Sport: जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने “महादेवा” योजनेअंतर्गत १३ वर्षांखालील फुटबॉलपटूंसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही चाचणी ता. ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अहमदनगर कॉलेज, अहिल्यानगर येथे होणार आहे.
या निवड प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीसोबत खेळण्याची अद्वितीय संधी मिळणार आहे. इच्छुकांनी तातडीने खालील नोंदणी लिंकद्वारे आपली नोंदणी पूर्ण करावी आणि चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे बरोबर आणावीत. नोंदणीसाठी लिंक: नोंदणी फॉर्म उघडा
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी सांगितले की, राज्यात फुटबॉल खेळाचा प्रसार आणि विकास साधण्यासाठी क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने ही “महादेवा” योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यभरात १३ वर्षांखालील मुले व मुली यांच्यासाठी जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत.
संबंधित शाळांनी आपल्या शाळेतील १३ वर्षांखालील मुला-मुलींना ३१ ऑक्टोबर २०२५, सकाळी ९:०० वाजता चाचणी स्थळी उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. खेळाडूंनी चाचणीदरम्यान मूळ आधारकार्ड व जन्मप्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
आता नोंदणी करा
अधिक माहितीसाठी संपर्क
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर. आयोजक: क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको व WIFA.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


