अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar dipotsav: अखंड मराठा साम्राज्य फाऊंडेशनच्या वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोमवार, ता. २० ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित “एक दिवा आपल्या स्वराज्याच्या देवासाठी” या उपक्रमात शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिवतीर्थ, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, माळीवाडा बसस्टॅण्ड येथे संध्याकाळी शेकडो भक्तांनी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांना अभिवादन केले. दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण शिवतीर्थ उजळून निघाले, तर “जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी!” या घोषणांनी परिसर दुमदुमला आणि देशभक्तीची ऊर्जा भरली.
या उपक्रमाचे उद्दिष्ट स्वराज्याच्या स्मृतींना उजाळा देत तरुण पिढीमध्ये शिवसंस्कार जागवणे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, गोरख दळवी, अशोक गाडे, मनोज बारस्कर, गोरक्षनाथ पटारे, सिद्धांत पानसरे, निलेश सूंबे, वैभव भोगाडे, सागर शेळके, रामभाऊ सातपुते, भारत भोसले, गणेश नाईकनवरे, सौरव गांगर्डे, अॅड. अनुराधा येवले, अॅड. स्वाती जाधव आणि अनेक शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “स्वराज्याच्या तेजात आपला दिवा लावा” या संदेशाने दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


