Ahilyanagar cultural: रुग्णालयातील नातेवाईक व रस्त्यावरील वंचितांची दिवाळी ‘घरघर लंगर सेवे’ने केली गोड

Photo of author

By Dipak Shirsath

 

Ahilyanagar cultural,घरघर लंगर ,दिवाळी,

अहिल्यानगर | प्रतिनिधी

Ahilyanagar cultural: शहरातील जिल्हा रुग्णालय तसेच रस्त्यावर, पालांमध्ये आणि उघड्यावर राहणाऱ्या वंचित घटकांच्या अंगणात दिवाळीचा आनंद पोहोचवत ‘घरघर लंगर सेवे’च्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. दिवे प्रज्वलित करून, फुलझड्या फोडून आणि फराळाचे पाकिटे वाटप करत समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनात आनंदाचा दिवा पेटवला.

घरापासून दूर असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जिल्हा रुग्णालय परिसरात विशेष दिवाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लंगर सेवेच्या सेवादारांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर बोलावून एकत्रित फुलझड्या पेटवल्या, उत्सवाचा आनंद साजरा केला आणि फराळ भेट म्हणून दिला. यावेळी सर्वांसाठी सदृढ आरोग्य, सुख आणि समृद्धीची प्रार्थना करण्यात आली.

Ahilyanagar cultural politics: अहमदनगर मनपाच्या माजी विरोधी पक्षनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल! ‘महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश होऊ देणार नाही’ म्हणत धार्मिक ध्रुवीकरणाला कडाडून विरोध

शहरातील विविध रस्त्यांवर फेरीवाले, लहान व्यावसायिक तसेच पालांमध्ये राहणारे कुटुंबे या उपक्रमात सहभागी झाली. लंगर सेवेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या झोपड्यांमध्ये जाऊन दिवे पेटवले, फटाक्यांची आतषबाजी केली आणि फराळाचे पाकिटे वाटले. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या या प्रेमळ भेटीमुळे वंचित वर्ग भावुक झाला.
‘घरघर लंगर सेवा’ गेल्या काही वर्षांपासून वंचित घटकांपर्यंत सणांचा आनंद पोहोचवण्याची परंपरा जपत आहे. कोरोनाच्या काळातही या सेवेने भुकेल्यांना अन्न आणि मदत पोहोचवून माणुसकीचा दिवा पेटवला होता. दिवाळी हा केवळ दिव्यांचा नव्हे तर आनंद वाटण्याचा सण आहे, या भावनेतूनच हा उपक्रम राबवण्यात आला.

Ahilyanagar cultural,घरघर लंगर ,दिवाळी,

या वर्षीच्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी झालेल्या उपक्रमात हरजितसिंह वधवा, करनसिंग धुप्पड, राजा नारंग, कैलाश नवलानी, सुनील थोरात, दलजीतसिंह वधवा, सिमरजीतसिंह वधवा, लिओ गुरनूरसिंग वधवा, प्रशांत मुनोत, हर्ष कित्हानी, रीत जाजू, आहिल शेख आदी सेवादारांनी सहभाग घेतला.
या सामाजिक उपक्रमासाठी जनक आहुजा, प्रिथपालसिंग धुप्पर, सतीश गंभीर, गुलशन कंत्रोड, राजू जग्गी, राजेंद्र कंत्रोड, राहुल बजाज, अभिमन्यू नय्यर आदींनी मोलाचे योगदान दिले.
लंगर सेवेच्या या कार्यातून माणुसकीचा, करुणेचा आणि सामाजिक ऐक्याचा दिवा समाजात तेजाने प्रज्वलित झाला आहे.

Ahilyanagar cultural,घरघर लंगर ,दिवाळी,

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया; लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यांत E-KYC अनिवार्य

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group