Ahilyanagar chess tournament: अहिल्यानगर येथे खुली बुद्धिबळ स्पर्धा; विजेत्याला 1 लाखांचे बक्षीस

Photo of author

By Dipak Shirsath

 

Ahilyanagar chess tournament,अहिल्यानगर,बुद्धिबळ स्पर्धा ,

अहिल्यानगर | प्रतिनिधी

Ahilyanagar chess tournament: अहिल्यानगरमध्ये शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित “शांतीकुमार फिरोदिया अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा” बुधवार, ता. ५ नोव्हेंबर पासून ते ९ नोव्हेंबरपर्यंत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे पार पडणार आहे. अशी माहिती जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

या स्पर्धेत देशभरातील अनेक राज्यांमधील खेळाडू सहभागी होणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू आदी राज्यांतील २०० हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.

इंटरनॅशनल मास्टर आदित्य डिंगरा (हरियाणा), राहुल संगमा (गुजरात), अनुप देशमुख (महाराष्ट्र) यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.

Ladki Bahin Yojana E-KYC: 18 नोव्हेंबरपर्यंत लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करा- मंत्री आदिती तटकरे

स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू साडेपाच वर्षांचा असून सर्वात ज्येष्ठ खेळाडू ८३ वर्षांचे आहेत, अशी माहिती सचिव यशवंत बापट यांनी दिली. बुधवारी सकाळी ११.३० वाजता स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, एकूण नऊ फेऱ्या खेळविण्यात येणार आहेत.
समारोप व बक्षीस वितरण सोहळा रविवार, ता. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार असून,
या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया असतील.

स्पर्धेसाठी पंच म्हणून विनिता श्रोत्री (पुणे), श्रद्धा विंचवेकर (पुणे), शार्दुल तापसे (सांगली), पवन राठी (पुणे) कार्यरत राहणार असून, त्यांना आठ सहाय्यक पंच मदत करणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, देवेंद्र ढोकळे, सनी गुगळे,
प्रशांत गंगेकर, रोहित आडकर, मनीष जस्वनी, चेतन कड, प्रकाश गुजराती, विशाल गुजराथी, नवनीत कोठारी, स्वप्नील भागुरकर, दत्ता गाडगे, सुनील जोशी
आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

अहिल्यानगर शहरातील खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच पालक व बुद्धिबळप्रेमींनी
उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
यशवंत बापट – ९३२६०९२५०१
परूनाथ ढोकळे – ९८५०७०४२६८

हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

 

 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group