सामाजिक कार्यकर्ते ‘निर्भय बनो’चे हेरंब कुलकर्णी यांच्यावर जिवघेणा हल्ला; सामाजिक संघटना घेणार एस.पीं.ची भेट

Photo of author

By Dipak Shirsath

 

( एक्सप्रेस फोटो )



सुपरफास्ट बातमी
अहमदनगर (प्रतिनिधी) ९.१०.२०२३

   राज्यातील शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेले आणि ‘निर्भय बनो’ चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर रासनेनगर जवळील जोशी क्लासेसजवळ जिवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे कारण स्पष्ट होत नाही. हेरंब कुलकर्णी हे अकोल्याहून अहमदनगर शहरातील सिताराम सारडा विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून रूजू झाल्यावर शाळेलगतच्या विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणार्‍या बेकायदेशिर सिगारेट, तंबाखू विक्रीच्या पानटपर्‍या महानगरपालिकेच्या पाठपुराव्याने काढून टाकल्या होत्या. त्यामुळेच हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

    शनिवारी ता. ७ रोजी शाळा सुटल्यावर आपले सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांच्या गाडीवर घरी जाताना रासनेनगर परिसरात दुपारी १२.२५ वा. सराईत गुन्हेगार यांनी दोघांवर लोखंडी राॅडने जीवघेणा हल्ला केला. हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी बघ्यांची गर्दी होती पण कोणीही मदतीला धावून आले नाही. गुन्हा दाखल करण्यात आला, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

    सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दिसत असून पोलिसांनी मनावर घेतले तर हल्लेखोर आणि त्यांचा मास्टरमाईंड तातडीने पकडले जातील.
     त्यासंदर्भात अहमदनगर शहरातील सामाजिक संघटना जिल्हा पोलिस अधीक्षक यांची आज दुपारी १२:३० वाजता भेट घेणार आहेत.

Leave a Comment