Site icon सुपरफास्ट बातमी

संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातल्या निंबळक व इसळक येथे ‘कॅण्डलमार्च’चे आयोजन

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( निंबळक )२९.१०.२०२३

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आरक्षणावरील भूमिकेला राज्यातील विविध भागांतून पाठिंबा मिळत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभर राजकीय नेते , आमदार , खासदार यांना गावबंदी तसेच घेराव घालत सभा उधळून लावल्या जात आहेत. अहिंसक मार्गाने साखळी उपोषण , कॅण्डल मार्च ,आमरण उपोषण केले जात आहे.

त्यातच संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातल्या निंबळक व इसळक ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी घातली आहे. तसेच उद्या सोमवार दि. ३० रोजी संध्याकाळी ०८:०० वाजता कॅण्डल मार्चचे आयोजन सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये इसळक व निंबळक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 
Exit mobile version