प्रतिनिधी ( श्रीरामपूर ) १५.११.२०२३
सम्राट बळीराजा स्मृतिदिनानिमित्त महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने श्रीरामपूर मध्ये बळीराजा गौरव दिन तसेच क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सम्राट बळीराजा, लहुजी वस्ताद साळवे पंडित व जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी बामसेफचे राज्य प्रचारक रमेश मकासरे ,लाल निशान पक्षाचे कॉम्रेड जीवन सुरडे , शेतकरी संघटनेचे विठ्ठल दौंड, बहुजन क्रांती मोर्चाचे एस के चौदंते, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा महासचिव फ्रान्सिस शेळके यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन पर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते आर एम धनवडे, माजी नगरसेवक के सी शेळके, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे मुस्ताक भाई तांबोळी, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा संघटक एस के बागुल, भारत मुक्ती मोर्चाचे श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष डॉक्टर अशोक शेळके, संभाजी ब्रिगेडचे संजय बोंबले , विद्रोही विद्यार्थी संघटनेचे अमोल सोनवणे , भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रतीक जाधव, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा चे पास्टर राजेश कर्डक संतोष गायकवाड, रवी बोर्डे, भारत शिंगे, राष्ट्रीय मूळनिवासी कर्मचारी संघाचे डॉक्टर सुरेश गवई, प्रोटांनचे तालुकाध्यक्ष शाकीर शेख , बामसेफचे एन डी साळवे, बाबासाहेब थोरात ,सर्जेराव देवरे, शाम रणपिसे, विजय जगताप , एम एस गायकवाड बुद्धिस्टे इंटरनॅशनल नेटवर्कचे राजेश हिवाळे, भारतीय बौद्ध महासभेचे सी एस बनकर, प्रमोद शेळके यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.