शासकिय चित्रकला स्पर्धेत फातिमा शेख अव्वल

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( अहमदनगर ) ०४.०१.२०२४
शासकीय इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेत चाँद सुलताना हायस्कूलच्या फातिमा फिरोज शेख हिने यश संपादन केले. तर शाळेत प्रथम येण्याचा बहुमान तिने पटकाविला आहे.

शेख हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉ. भैरवनाथ वाकळे, संतोष गायकवाड, कॉ. मेहबूब सय्यद, संध्याताई मेढे, कॉ. फिरोज शेख आदी उपस्थित होते.

फातिमा शेख ही इयत्ता दहावीमध्ये शिकत असून, तिने उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर एलिमेंटरी व इंटरमिडिएट परीक्षेत यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी तिने रचना कला महाविद्यालयामध्ये तयारी केली असून, विद्यालयाचे प्राचार्य शेकटकर सर व चाँद सुलताना हायस्कूलच्या कला शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Comment