शाळादत्तक योजनेच्या नावाखाली आपली शाळा गर्भश्रीमंताच्या घशात घालू नये यासाठी माजी विद्यार्थ्यांने मागितली भीक

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( यवतमाळ ) ११.११.२०२३
राज्य सरकारने मागील महिन्यात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी  ‘शाळा दत्तक योजना’ राबवली जाणार आहे असा शासन निर्णय घेतला. विशेष म्हणजे देणगीदाराने सुचवलेले नाव संबंधित सरकारी शाळेस देता येणार आहे. 
त्या निर्णयाविरोधात यवतमाळ येथील आर्णीचे रहिवासी असलेले कवी विजय ढाले यांनी आपली शाळा सरकारने या योजनेच्या नावाखाली गर्भश्रीमंतांच्या घश्यात घालू नये यासाठी भीक मागीतली. 
त्यांनी दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपल्या दोन्ही किडन्या विकाव्यात व सरकारी शाळेचा खर्च भागवावा असं पत्र लिहिले होते. तरीही पैसे कमी पडू नयेत म्हणुन त्यांनी भीक मागितली हे पैसेही ते सरकारला पाठविणार आहेत.
सरकारी शाळांना पैसे देऊन स्वतःचे नाव देण्याची स्कीम महायुती सरकारने आणली आहे. ही योजना म्हणजे म्हणजे चमकोगिरी करण्यासाठी पैसा वापरणाऱ्या काही लोकांसाठी सुवर्ण संधी आहे. ज्या सरकारी शाळेमध्ये तुम्ही शिकला ती शाळा आता कोणीतरी विकत घेऊन त्यावर स्वतःचे नाव लिहिलेले तुम्हाला तरी आवडेल का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment