विविध मागण्यांसाठी शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी बेमुदत संपावर

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( अहमदनगर ) २३.१२.२०२३
अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी येत्या २५ डिसेंबर या तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे नाताळच्या सुट्टीत शनीदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विधानसभेत झाल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच आता विश्वस्त मंडाळाविरोधात कर्मचारीही संपावर जाणार आहेत. शनीशिंगणापूर देवस्थानचे ४०० कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या २५ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. विश्वस्त मंडाळासोबत कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली, मात्र यात कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. कर्मचारी संपावर गेले तर सुरक्षा, निवास , भोजन यासह इतर समस्यांना भक्तांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे देवस्थान प्रशासनाने कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार पदे दिली जावी.


मागण्या पूढीलप्रमाणे
  • पाचव्या वेतन आयोगानुसार २००३ पासून फरक दिला जावा.
  • सातवा वेतन आयोग लागू केला जावा.
  • कुटुंबाला वैद्यकीय उपचार मोफत द्यावे.
  • मृत कर्मचाऱ्यांच्या घरातील एकाला नोकरी द्यावी.

अशा मागण्या कर्मचाऱ्यनी केल्या आहेत.

Leave a Comment