सुपरफास्ट बातमी

राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या भाजपाचा तीव्र निषेध ; नाना पटोले

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( मुंबई ) ०६.१०.२०२३
सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आणि इंडिया आघाडीला घाबरलेल्या भाजपाने नैराश्यातून मा. राहुल गांधी यांचा फोटो रावणाच्या रूपात फोटोशॅाप करून आपल्या सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. राहुल गांधी यांना रावणाची उपमा देणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या भाजपा तीव्र निषेध करत त्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे आज शुक्रवार दि.०६ ऑक्टोंबर २०२३ दुपारी ०२.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, चेंबुर स्टेशन जवळ, मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहीती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्विटरद्वारे दिली.
Exit mobile version