Site icon सुपरफास्ट बातमी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनिदर्शन

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( अहमदनगर ) ३०.११.२०२३
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. 

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

Read Also: छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाचवेळी 11 ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी

राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी  अभिषेकही केला.


अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.शनीशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात  राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.

Read Also: रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर ऑनलाईन माहिती देण्याची सुविधा
Exit mobile version