अहमदनगर ०२.१०.२०२३
मराठा आरक्षणासाठी तब्बल १६ दिवस उपोषण करून सरकारला सळो की पळो सोडणारे मनोज जरांगे हे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. आपली भूमिका
स्पष्ट करत पुढिल आंदोलनाची ध्येयधोरणे ठरवत आहेत. त्यांची शनिवार दि. ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता अहमदनगर एमआयडीसी येथील रेणुकामाता मंगल कार्यालय येथे जाहीर सभा होत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठी तब्बल १६ दिवस आमरण उपोषण केले होते.सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते व ४० दिवसांत जर सरकारने आरक्षणसंदर्भात ठोस पावले उचलली नाहीत तर पुन्हा मोठा लढ़ा उभारण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला होता. सध्या राज्यातील विविध भागात ते सभा व गाठीभेटी घेत आहेत. आता येत्या शनिवारी ते अहमदनगरमध्ये येणार आहेत. अशी माहीती मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर यांनी दिली.
अशी असेल पार्किंगव्यवस्था..