भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याने प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू

Photo of author

By Dipak Shirsath


सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( अहमदाबाद )२३.१०.२०२३
वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले आहे. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे उद्योगजगताला धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि मुलगी परीशा असा परिवार आहे. मागील आठवड्यात त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना ब्रेन हेमरेज झाला होता आणि ते रुग्णालयात दाखल होते. अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. 

पराग देसाई हे वाघ बकरी चहा समूहाच्या सहा संचालकांपैकी एक होते.पराग देसाई नेहमी मॉर्निंग वॉकला जात असत. १५ ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे इस्कॉन अंबली रोडवर मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्लापासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरला. त्यात ते खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्यावर झायडस रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु रविवारी सकाळीच त्यांचे निधन झाले.

Leave a Comment