निंबळक येथे योगदिवस साजरा ; आत्मनिर्धार फाउंडेशन व आझाद तरुण मंडळाचा उपक्रम
अहमदनगर | २१ जून | प्रतिनिधी
सध्या धावपळीच्या जीवनात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. नियमितपणे योगासन, प्राणायाम करणे आरोग्यासाठी हितकारक असून त्यामुळे सदृढ आणि निरोगी जीवनाचा आनंद मिळवता येतो, असे योगशिक्षक भानुदास कोतकर यांनी सांगितले.
आत्मनिर्धार फाउंडेशन आणि आझाद तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगदिनाच्या निमित्ताने निंबळक येथे सामूहिक योगसत्र आयोजित करण्यात आले. पहाटे पाच ते सात या वेळेत योगाभ्यास पार पडला. महादेव गवळी यांच्या आवाहनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी भाऊसाहेब म्हस्के, राजेंद्र खुंटाळे, त्रिदल सैनिक संघाचे मारुती ताकपिरे, रामदास कोतकर, सुदाम म्हस्के, संपत गायकवाड, अजित शिंदे, रंगनाथ सोनवणे, नामदेव लोंढे यांच्यासह ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगाचे प्रात्यक्षिक आणि महत्व
योगशिक्षक दत्तात्रय शिरोळे यांनी विविध योगासने आणि व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर करत त्याचे फायदे उलगडून सांगितले. आपल्या अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले. “योगसाधनेत सातत्य राखण्यासाठी लवकरच योगवर्ग सुरू करण्याचा मानस आहे,” असे ते म्हणाले.
हे हि वाचा : २१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन : भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव