निंबळक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मंजुश्री कुलट तर उपाध्यक्षपदी अप्पा आमले यांची निवड

Photo of author

By Dipak Shirsath





सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( निंबळक ) २७.११.२०२३
नगर तालुक्यातील निंबळक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या  अध्यक्षपदी मंजुश्री कुलट तर उपाध्यक्षपदी अप्पा आमले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या या निवडीमध्ये अध्यक्षपदावर महिलेला संधी मिळाली आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने नव्याने समीती गठीत करण्यासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पालकांमधून समितीची निवड करण्यात आली. समितीमधुन अध्यक्षपदी मंजुश्री कुलट तर उपाध्यक्षपदी अप्पा आमले यांची निवड करण्यात आली.



शाळा व्यवस्थापन समितीच्या झालेल्या निवडीबद्दल नुतन अध्यक्ष , उपाध्यक्ष व समिती सदस्यांचे सरपंच प्रियंका ताई लामखडे , लेखक डॉ. संजय कळमकर , नुतन केंद्रप्रमुख पोपटराव धामणे सर , ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे , राष्ट्रवादीचे युवक चे उपाध्यक्ष अतुल कुलट , तौफिक पटेल यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Read Also: निंबळक रेल्वेगेट येथे उड्डाणपुल करण्याची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी

यावेळी रघुनाथ झावरे, सुखदेव पालवे, दत्तात्रय जाधव, भागचंद सातपुते, शरद जाधव, विशाल कुलट, श्रीम.अलका कांडेकर, प्रज्ञा हापसे, सुनिता रणदिवे, सुजाता किंबहुणे, शैला सरोदे , प्रयागा मोहळकर, अर्चना जाचक, मुक्ता कोकणे यांसह शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र निमसे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय जाधव सर आणि आभार सुखदेव पालवे सर यांनी मानले.

Read Also: निंबळक बायपास येथील उड्डाणपुलाच्या व रस्त्याच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Leave a Comment