सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( निंबळक )१३.०१.२०२४
शुरांच्या प्रेरक कथा प्रसारित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये नागरी सजगतेची भावना निर्माण होण्यासाठी संरक्षण मंत्रालय व शालेय मंत्रालय यांच्यामार्फत विद्यार्थी वीरगाथा हा उपक्रम संपूर्ण भारत देशभर राबविण्यात आला. शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता, परिच्छेद,चित्रकला, रेखाचित्र असे उपक्रम शाळा स्तरावर घेण्यात आले. या उपक्रमासाठी संपूर्ण भारतातून १०० विजेत्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे . यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव निवड झालेली निंबळक शाळेतील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु.गौरी किरण उगले आहे . गौरीचा तिच्या वर्गशिक्षक व पालकांसहित दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात दहा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानपूर्वक भारताच्या महामहीम राष्ट्रपती मान.द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते सन्मान होणार असल्याची माहिती निंबळक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निमसे यांनी दिली .
ही स्पर्धा संपूर्ण देशभर ऑनलाईन पद्धतीने झाली असून या स्पर्धेमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . कुमारी गौरी उगले ही संपूर्ण देशातून पंधराव्या व महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने विजेती झाली आहे.
शालेय स्तरावर उपक्रमशील वर्गशिक्षिका अर्चना जाचक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले . गौरी,मार्गदर्शक शिक्षिका,आई, वडील , निंबळक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे या निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले . याकामी डाएट संगमनेरचे प्राचार्य डॉ राजेश बनकर ,प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व वीरगाथा प्रकल्पाच्या जिल्हा नोडल अधिकारी ज्योती निंबाळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .
या देशस्तरीय दैदिप्यमान यशाबद्दल कु.गौरी उगले, मार्गदर्शक शिक्षिका अर्चना जाचक ,आई, वडील , निंबळक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निमसे व शाळेतील शिक्षक रघुनाथ झावरे, सुखदेव पालवे,दत्ता जाधव, भागचंद सातपुते , शरद जाधव,विशाल कुलट , अलका कांडेकर, प्रज्ञा हापसे, सुनिता रणदिवे, सुजाता किंबहुने, शैला सरोदे,प्रयागा मोहळकर, मुक्ता कोकणे या सर्वांचा जिल्हा परिषद अहमदनगर, पंचायत समिती नगर (प्राथमिक शिक्षण प्रशासकीय विभाग ) निंबळक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच सर्व सन्मा. ग्रा.पं.सदस्य , निंबळक विविध कार्य. सेवा सह. सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन ,सर्व सन्मा. संचालक तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्मा. सदस्य सर्वांच्या वतीने अभिनंदन करून सन्मान करण्यात आला .
या सन्मान प्रसंगी निंबळक गावच्या सरपंच प्रियांकाताई लामखडे, नगर तालुका पंचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार,सामाजिक कार्यकर्ते बी.डी कोतकर,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दिवटे,सोमनाथ खांदवे,शिवाजी दिवटे,अतुल कुलट,निलेश पाडळे, ग्रामस्थ,पालक, विस्तार अधिकारी रामनाथ कराड , केंद्रप्रमुख विलास मूनोत उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्रणित निंबळक शाळेच्या गौरी उगले हिने मिळवलेल्या या देशस्तरीय सुवर्ण संस्मरणीय यशाबद्दल जिल्हाभरातून सर्व राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यामध्ये राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील ,नगर दक्षिणचे खासदार सुजयजी विखे पाटील, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,आमदार निलेशजी लंके ,माजी जि. प.सदस्य माधवराव लामखडे ,अहमदनगर जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.)श्री भास्करराव पाटील ,नगर तालुका गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव आदींनी अभिनंदन केले आहे .
निंबळक शाळेचा पीएमश्री या देशस्तरीय योजनेत समावेश झाला असून लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जा सारख्या सुविधा या शाळेत उपलब्ध होणार आहेत . यामूळे या शाळेचा शेक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीस मदत मिळणार असून याचा फायदा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यात होणार आहे . या विविध उपक्रमांमूळे जि प शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन हा निश्चितच बदलणार आहे .
– राजेंद्र निमसे (मुख्याध्यापक )