नांदेड, संभाजीनगर, नागपूर शासकीय रुग्णालयातील मृत्यू सरकारी अनास्थेचे बळी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी.

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( शेवगाव ) ०५.१०.२०२३
नांदेड, संभाजीनगर, नागपूर व या पूर्वी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा व आवश्यक ते डॉक्टर व कर्मचारी स्टाफ नेमला नसल्याने लहान बालकांसह मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू म्हणजे सरकारी अनास्थेचे बळी असून राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड सुभाष लांडे व राज्य कौन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे यांनी केली आहे, शासकीय रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध न करता सर्व सामान्य माणसांना मृत्यूच्या खाईत लोटले जात आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खाजगीकरणाचा सरकारचा हा डाव असून जनतेने सरकार चा हा डाव उधळून लावला पाहिजे व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज शेवगाव येथे नांदेड, संभाजीनगर, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
यावेळी बापूराव राशिनकर, संदिप इथापे, राम लांडे, आत्माराम देवढे, बबनराव पवार, दत्ता आरे,योहान मगर, गोरक्षनाथ काकडे 
आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Comment