नगर – मनमाड रेल्वे मार्गावर गुरुवारी दुहेरीकरणाची चाचणी , निंबळक – वांबोरी मार्गावर १२५ वेगाने धावणार रेल्वे नागरीकांना दिला सतर्कतेचा इशारा

Photo of author

By Dipak Shirsath


सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी (अहमदनगर)२८.०२.२०२४
नगर-मनमाडदरम्यान नव्याने झालेल्या दुहेरी रेल्वेमार्गावर गुरुवारी दि.२९.०२.२०२४ रोजी निंबळक ते वांबोरी या टप्प्यातील ट्रॅकवर चाचणी होणार आहे. १२५ किलोमीटर प्रतितास वेगाने ही रेल्वे धावेल. सुरक्षेच्या दृष्टीने या काळात रेल्वे ट्रॅक जवळ कोणीही फिरकू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या मार्गावर आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपेक्षा अतिवेगाने रेल्वे धावणार असल्याने गुरुवारी दुपारी १२ ते रात्री आठ वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅकजवळ कोणीही येऊ नये. आसपासच्या गावांमधील नागरिकांनी या दिवशी आपली जनावरे रेल्वे ट्रॅकजवळ सोडू नयेत. रेल्वे ट्रॅकशेजारी राहणाऱ्या नागरिकांनीही याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन नगर विभागाचे उपमुख्य अभियंता (बांधकाम) दीपककुमार यांनी केले आहे.


मनमाड ते दौंड रेल्वेमार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. सध्या एकेरी मार्ग असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी आहे. एकेरी मार्गामुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. त्यामुळे तासन् तास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागते. लवकरच हा पूर्ण मार्ग दुहेरी होणार असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे.

या कामामुळे रेल्वे ताशी १२० प्रतिकिलोमीटर वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंडपर्यंत काम पूर्ण होणार आहे. या अगोदर नगर तालुक्यातील अकोळनेर ते सारोळा कासार या दुहेरी रेल्वेमार्गावर सुद्धा यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प या वर्षाअखेर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

Leave a Comment