प्रतिनिधी मुंबई ०३.१०.२०२३
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाचा खंड २३, जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद या नवीन चार ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणेचे खंड ४, खंड १२, खंड १५, खंड १७ (तीन भाग), खंड १८ (तीन भाग), आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथांच्या नवीन आवृत्तीचे देखील प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह, मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, समितीचे सदस्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, सदस्य माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. संभाजी बिरांजे, डॉ. बबन जोगदंड, डॉ. सुरेंद्र धाकतोडे, ज. वि. पवार, योगीराज बागुल, रुपेंद्र मोरे, सिद्धार्थ खरात, आदी उपस्थित होते.