छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( अहमदनगर ) ०९.१०.२०२३
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहिर करत १७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी करण्याचा दिनांक निश्चित करण्यात आला होता. परंतु आता प्रारुप मतदार यादीच्या प्रसिद्धीस २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे ;
  • २७ ऑक्टोबर २०२३ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे.
  • २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ दावे व हरकती दाखल करणे.
  • २६ डिसेंबर २०२३ दावे व हरकती निकाली काढणे.
  • ०१ जानेवारी २०२४ मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनासाठी आयोगाची परवानगी घेऊन मतदार यादी डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी मतदार याद्यांची छपाई करणे.
  • ०५ जानेवारी २०२४ मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करणे.
 ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकामध्ये झालेल्या बदलांबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Leave a Comment