छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाचवेळी 11 ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( छत्रपती संभाजीनगर ) ३०.११.२०२३
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत असून, शहरात आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाने संभाजीनगर शहरात 11 ठिकाणी एकाचवेळी या धाडी टाकल्या असल्याचे कळत आहे. या कारवाईत 200 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समावेश असल्याचे समोर येत आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 


छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आयकर विभागाने अचानक अकरा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे. या बांधकाम व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू असणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Leave a Comment