आशियाई क्रिडा स्पर्धेत बीडचे सुपुत्र अविनाश साबळे यांचा ऐतिहासिक विजय ,भारताला आणखी एक सुवर्णपदक

Photo of author

By Dipak Shirsath

 (google Image )

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( नवी दिल्ली )
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बीड येथील अविनाश साबळे याने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. अविनाश साबळेने ही शर्यत 8:19:53 च्या वेळेत पूर्ण करत ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे विजयी रेषा पार करताना एकही खेळाडू अविनाशच्या आसपास कॅमेऱ्यात सुद्धा दिसत नाही. अविनाश साबळेच्या या सुवर्ण कामगिरीवर आता देशभरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी देखील अविनाश साबळेचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

Leave a Comment