आळंदी दिंडित जाणाऱ्या ४ वारकऱ्यांवर काळाचा घाला. कंटेनर चालकाला डूलकी लागल्याने घडला अपघात

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

शिर्डी ( प्रतिनिधी ) ०४.१२.२०२३
शिर्डी येथून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या पायी
दिंडीमध्ये भरधाव कंटेनर घुसल्याने चार भाविकांचा जागीच
मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही
घटना संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील
घारगाव येथील सातवा मैल येथे काल दुपारी ०४:१५
वाजता घडली.

शिर्डी येथील श्री महंत काशिकानंद महाराज यांची साई
पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती. यात १५० ते
२०० भाविक होते. ही दिंडी घारगाव येथून जात असताना
दुपारी सव्वाचारच्या सुमारास सातवा मैल येथे चालकाला
डूलकी लागल्याने भरधाव कंटेनरचा (एमएच १२ व्हीटी १४५५) ताबा सुटला व कंटेनर या दिंडीत घुसला.
ताराबाई गंगाधर गमे (५०, रा. कोल्हाळे, ता. राहाता),
बबन पाटीलबा थोरे (रा. द्वारकानगर, शिर्डी, ता. राहाता),
भाऊसाहेब नाथा जपे (रा. कनकोरी, ता. राहाता) व
बाबासाहेब अर्जुन गवळी (मढी बुद्रुक, ता. कोपरगाव) अशी मृतांची नावे आहेत, तर ओंकार नवनाथ चव्हाण (१७),
राजेंद्र कारभारी सरोदे (६०, रा. मढी बुद्रुक, ता. कोपरगाव),
अंकुश ज्ञानेश्वर कराळे (३५), शरद सचिन चापडे (१७, रा.
ज्ञानेश्वर मंदिर, शिर्डी), बिजलाबाई अशोक शिरोळे (६०,
वाळकी, ता. राहाता), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (५০,
रा. वेस, ता. कोपरगाव), मिराबाई मारुती ढमाले (६०, रा.वावी-दुशिंगवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक), निवृत्ती पुंजा
डोंगरे (६०, रा. पिंपळगाव-धनगरवाडी, ता. सिन्नर, जि.
नाशिक) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना संगमनेरच्या
कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले
होते. या अपघातात आणखी भाविक जखमी
असल्याचे समजते.


जखमी वारकऱ्यांना सर्वोतपरी मदत करणार

शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांना सर्वोतपरी मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून, दिंडीतील सहभागी इतर वारकऱ्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोच करण्याची व्यवस्था केली आहे. अशा सुचना पालकमंत्री विखे पाटिल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Leave a Comment