आमदार निलेश लंके यांच्या निधीतून निंबळक शाळेला पेव्हिंग ब्लॉक ; सरपंच प्रियंका लामखडे यांच्या हस्ते शुभारंभ

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( निंबळक ) ३१.१२.२०२३
निंबळक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात आमदार नीलेश लंके यांनी दिलेल्या दहा लाख रुपयांच्या निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येत आहेत. या कामाचा शुभारंभ सरपंच प्रियांका लामखडे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार लंके यांनी निंबळकच्या विकासासाठी आतापर्यंत जवळपास सहा कोटी रूपयांचा निधी दिल्याचे सरपंच लामखडे यांनी सांगितले. शाळेच्या आवारात सर्व बाजूंनी पेव्हिंग ब्लॉक बसवून मध्यभागी मुलांना खेळण्यासाठी मैदान ठेवण्यात येणार आहे.


यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजुश्री कुलट, उपाध्यक्ष आप्पा आमले, ग्रामपंचायत सदस्य बाबा पगारे, दत्ता कोतकर, समीर पटेल, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष अतुल कुलट, मुख्याध्यापक राजेंद्र निमसे, अशोक दळवी , तुकाराम गेरंगे, अलका कांडेकर, प्रज्ञा हापसे, सुनिता रणदिवे, सुजाता किंबहुणे, शैला सरोदे, प्रयागा मोहळकर, अर्चना जाचक, मुक्ता कोकणे आदींसह शिक्षक , ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment