Site icon सुपरफास्ट बातमी

आदर्शगाव हिवरेबाजार मध्ये गांजाची शेती , शेतकऱ्यावर गुन्हा दाखल


सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी (अहमदनगर ) २७.०२.२०२४
आदर्श गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह भारताला परिचित असलेले हिवरे बाजार प्रसिद्ध आहे. या गावात विविध संकल्पना राबविल्या जातात. त्याचा अभ्यास करण्यासाठी जगाच्या पाठीवरून अभ्यासक या ठिकाणी येत असतात. परंतु आता आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये चक्क गांजाची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथील शेतकरी साहेबराव मारुती ठाणगे यांनी आपल्या शेतामध्ये गांजाचे झाड लावल्याचे नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या ठिकाणी तब्बल अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी साहेबराव मारुती ठाणगे यांच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल मंगेश खरमाळे यांच्या फिर्यादीवरून दि.26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Exit mobile version