Site icon सुपरफास्ट बातमी

अहमदनगर तालुक्यासाठी होणार स्वतंत्र अपर तहसिल कार्यालयाची स्थापना


सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( अहमदनगर ) १९.१०.२०२३
अहमदनगर जिल्हयातील अहमदनगर तालुक्याचे वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण व तालुक्यातील रहिवास क्षेत्राचा झपाट्याने झालेला विस्तार इ. बाबींमुळे सध्याच्या अहमदनगर
तालुक्यातील तहसील कार्यालयावर कामकाजाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हयातील अहमदनगर तालुक्यात अहमदनगर येथे स्वतंत्र अपर तहसील
कार्यालय स्थापन होणार आहे. त्याकरिता अपर तहसिलदार व महसुल सहाय्यक ही दोन आवश्यक पदे नेमली जाणार आहेत.
तहसिलदारांकडे नालेगाव (३ ) , सावेडी ( २ ), कापूरवाडी (९ ) , केडगाव (८ ), भिंगार (१४ ), नागापूर (१२) , जेऊर (१२ ) , चिचोंडीपाटील (१३), वाळकी (१०), चास ( १३ ), रुई छत्तीसी (१३) अशा एकुण १०९ गावे व ११ सर्कलचा कार्यभार असणार आहे. तर अप्पर तहसिलदारांकडे नालेगाव (५ ), सावेडी (२ ), केडगाव (१ ), भिगार (१ ), नागापूर ( ३ ) अशा ५ सर्कल मधील १२ गावांचा कार्यभार असणार आहे.
या नवीन कार्यालयासाठी आवश्यक असणारी उर्वरित पदे अहमदनगर
कार्यालयातील उपलब्ध पदांमधुन वर्ग करुन नवीन कार्यालय तातडीने सुरु करण्याचे आदेश संतोष वि. गावडे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिले आहेत.
Exit mobile version