Site icon सुपरफास्ट बातमी

‘अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य सरकारतर्फे दहा लाख रुपयांची मदत

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( मुंबई ) २६.१०.२०२३
सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 
जवान अक्षय गवते हे बुलढाणा  जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.
Exit mobile version