Site icon सुपरफास्ट बातमी

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची होणार तपासणी

सार्वजनिक सुविधा व मानसिकतेची थेट पडताळणी

 

अहमदनगर | 24 जून | प्रतिनिधी

 

स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, आणि ग्रामस्थांच्या मानसिकतेचा आढावा घेण्यात येणार आहे.

या तपासणीसाठी केंद्र शासनामार्फत त्रयस्थ संस्था प्रत्यक्ष गावांना भेट देणार असून ग्रामपंचायतींनी प्रत्येक स्तरावर तयारी ठेवावी, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.

 

गुणांकन प्रक्रिया व तपासणी निकष

 

 

पाहणीमध्ये लक्ष दिले जाणारे मुद्दे 

 

 

भविष्यातील स्वच्छता योजना आणि लोकसहभाग

 

ग्रामपंचायतींनी जर या सुविधा भविष्यात बचतगट किंवा अन्य संस्थांमार्फत शाश्वतपणे चालविण्याचे नियोजन केले असेल, तर त्यालाही गुणांकनात महत्त्व दिले जाईल.

तसेच, गावात “स्वच्छता संदेश”, सुजल संकल्पना आणि कचरा व्यवस्थापनातून महसूलनिर्मितीबाबत ग्रामस्थांना माहिती असणे अत्यावश्यक आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन

 

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी जनतेला आवाहन केले आहे की, लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक सुविधा प्रभावीपणे वापराव्यात आणि स्वच्छतेसाठी सजग राहावे.

 

 

हे हि वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

 

 

 

 

 
 
 
Exit mobile version