वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कार्तिकी एकादशी निमित्त विठुरायाचे दर्शन २४ तास सुरू राहणार

Photo of author

By Dipak Shirsath

 

सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( पंढरपुर ) १६.११.२०२३
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज संध्याकाळपासून विठुरायाचे दर्शन २४ तास चालू राहणार आहे. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे भाविकांना कमी वेळ रांगेत उभे राहावे लागणार आहे.
दरवर्षी देशभरातुन असंख्य भाविक कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपूरमध्ये दर्शनासाठी असतात. विठुरायाचे दर्शन मिळावे, यासाठी तासनतास वारकऱ्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असते. ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीकडून २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात येते.
त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या पलंग काढून ठेवण्यात येतो. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होते अशी प्रथा आहे. आज सायंकाळी देवाचा पलंग बाहेर काढला जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्तिकी एकादशी ही २३ नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही दिवसांपूर्वी होत असलेल्या तयारीचा आढावा घेतला. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा ६५ एकर भक्ती सागर याची पाहणी केली. यावेळी त्यांनी दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना समितीला दिल्या.

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group