माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी दुःखद निधन

Photo of author

By Dipak Shirsath

 

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( अहमदनगर ) २७.१०.२०२३

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे गेल्या तीन आठवड्यापासून न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील साईदिप रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचं निधन झालं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ढाकणे हे चार वेळा आमदार तर एकवेळा खासदार होते. त्यांनी राज्यात तसंच केंद्रात मंत्रीपदं भूषवलं होतं. त्यांचं पार्थिव आज अहमदनगरच्या पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहात आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी २ वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ साली महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. ते जनता दलातर्फे बीड लोकसभेतून निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जामंत्री होते.

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group