मराठा बांधवांसोबत संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटिल १५ नोव्हेंबरपासुन महाराष्ट्र दौर्‍यावर

Photo of author

By Dipak Shirsath

 

सुपरफास्ट बातमी 

प्रतिनिधी ( जालना ) १०.११.२०२३
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलकर्ते मनोज जरांगे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात वाशी येथुन होणार आहे. 23 नोव्हेंबरला हा दौरा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातल्या बोधेगाव या ठिकाणी संपणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करणार आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 15 नोव्हेंबर पासून 23 नोव्हेंबरपर्यंत हा दौरा होणार आहे असं त्यांनी सांगितलं.
 १ डिसेंबर पासुन महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू राहील. तसेच दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात देशाला आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मारकापासून होणार आहे .तर शेवट शेवगावमध्ये होणार आहे, असंही ते म्हणाले.
असा असेल महाराष्ट्र दौरा
  • 15 नोव्हेंबर – वाशी, परांडा करमाळा
  • 16 नोव्हेंबर – दौंड, मायनी
  • 17 नोव्हेंबर -सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड
  • 18 नोव्हेंबर – सातारा, वाई, रायगड
  • 19 नोव्हेंबर – रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी
  • 20 नोव्हेंबर – तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याण
  • 21 नोव्हेंबर – ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर 
  • 22 नोव्हेंबर – विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर
  • 23 नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधगाव
मनोज जरांगे यांनी आपल्या पुढच्या टप्प्यातील दौऱ्याचीही घोषणा केली आहे. विदर्भ, राहीलेला मराठवाड्यातील भाग व कोकण असा पुढचा महाराष्ट्र दौऱ्याचा टप्पा असेल, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group