दिवाळीनिमित्त सरकारची खास भेट १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा मैदा अन पोह्याचाही समावेश.

Photo of author

By Dipak Shirsath

 

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( मुंबई ) ०४.१०.२०२३
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा
देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.
पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल
असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक
तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि
नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.
यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्था किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील, हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाच्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group